बंद एस.टी. सर्विस पुन्हा चालू न केल्यास सामान्य प्रवासां कडून आंदोलना ची तयारी

प्रकाश कृष्ण नलवडे की रिपोर्ट
बंद एस.टी. सर्विस पुन्हा चालू न केल्यास सामान्य प्रवासां कडून आंदोलना ची तयारी,रायगड जिल्यातील महाड एस टी डेपोचा व्यवस्थापना कडून प्रवाशांना होणारा मानसिक त्रास चालू च आहे.अनेक निवेदन देऊन देखील महाड ते रामदास पठार एस टी व पनवेल ते रामदास पठार एस टी या दोन गाड्यांच्या दैनिक फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या रामदास पठार, सुनेभाऊ, पारमाची,
पारमाची वाडी, बोद्ध वाडी, माझेरी, वरंध या गावातील सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलांना, एम आय डि सी मध्ये काम करणाऱ्या कामगारांना तसेच गावावरून मुंबई ला किंवा मुंबई वरून गावाला येणाऱ्या प्रत्येक प्रवशाला याचा मानसिक त्रास आज गेली कत्येक दिवस होत आहे.सातत्याने निवेदन देऊन देखील महाड डेपोचे मॅनेजर त्याची दखल घेत नाही.सदर रस्ता डोंगराळ भागातला असल्यामुळे गाडी चालू करता येत नाही अशी उत्तरे प्रवाशांना व निवेदन देणाऱ्या लोकांना मिळत असतात.आमचे म्हणणे असे आहे कि स्वता एस टी डेपोचे वरिष्ठ अधिकारी यांनी रस्त्याची पाहणी करून त्या रोड ची माहिती घ्यावी असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.गाडी च्या फेऱ्या चालू करण्यासाठी स्थानिक आमदार श्री भरतशेठ गोगावले साहेब यांनी प्रवाशांचे होणारे हाल पाहता एस टी आगार मॅनेजर यांना तातडीने गाडी चालू करण्याचे आदेश दयावेत.गाडी चालू न झाल्यास आंदोलन करावे लागेल असे स्थानिक प्रवाशांचे म्हणणे आहे.



