Karad News:गृहिणी दिनानिमित्त अंगणवाडी सेविकांना टीचर्स ट्रेनिंग देण्यात आले

कराड/महाराष्ट्र:इनर व्हील क्लब ऑफ कराड संगम यांच्या वतींने गृहिणी दिनाचे औचित्य साधून टीचर ट्रेनिग अंतर्गत बालकांची मानसिकता ओळखून त्यांच्याशी शिक्षकांचे वर्तन कसे असावे या विषयी कृष्णा विद्यालयातील प्रो.डॉ वैशाली राजे यांच्या व्यख्यनाचे आयोजन अंगणवाडी सेविकांसाठी करण्यात आले होते. या वेळी डॉ राजे यांनी सेविकांना उत्तम मार्गदर्शन केले.त्यांच्या प्रश्नाचे निरसन केले.या वेळी मसूर बिट,कोपर्डे,हेलवाक येथील अंगणवाडी सेविका उपस्तीत होत्या. कार्यक्रमाला सुपरवायझर वंदना केंजळे ,कुंभार मॅडम उपस्तीत होत्या.तसेच क्लब प्रेसिडेंट तरुना मोहिरे,सेक्रेटरी छाया पवार,माहेश्वरी जाधव ,सारिका शहा,अंजना माने,पुष्पा चौधरी,वृषाली पाटणकर,दीपाली लोहार,सुषमा तिवारी, निमिषा गौर,सारिका वेल्हाळ उपस्तीत होत्या.या वेळी सर्व सेविकांना दिवाळी निमित्त भेटवस्तु क्लब च्या वतीने देण्यात आल्या.कार्यक्रम कोपर्डे येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉल मध्ये पार पडला. महाराष्ट्र कराड होऊन पियुष गोर यांची रिपोर्ट



