Akola news:बसव विचार समिती,आकोट व शिक्षक मित्रपरिवार,अकोट यांच्या संयुक्त विद्यमानाने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव उत्साहात साजरा

रिपोर्ट:मोहम्मद जुनेद

विद्याचंल द स्कुल अकोट , जि. अकोला दि. २३एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ०६:०० वाजता जगतज्योती ,समतानायक महात्मा बसवेश्वर यांच्या ९१८ व्या जयंतीनिमित्त बसव विचार समिती व अकोट शिक्षक मित्र परिवार अकोट प यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती उत्सव व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते.सदर उत्सव समारंभाचे अध्यक्षस्थानी मा. डाॅ विशाल आप्पा इंगोले तर प्रमुख उपस्थिती मा.संजय खडसे (उपजिल्हाधिकारीअकोला ),मा.संतोष महल्ले (पोलीस निरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, अकोला)सुरेश वाळोदे (उप वनसंरक्षक अकोला) अकोला,मा.ब्रिजमोहन गांधी (जेष्ठ विद्यीतज्ञ अकोट)सौ.संध्याताई वाघोळे (माजी अध्यक्ष जि.प अकोला) मा.दिनेश भुतडा (संचालक विद्याचंल स्कुल, अकोट) श्रीमती ठाकरे मॅडम (पोलीस विभाग अकोट) यांची उपस्थिती होती.
महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचा मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 🎖️आरोग्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट अकोट 🎖️सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोटरी क्लब आकोट🎖️ जिल्हास्तरीय विद्यार्थी खेळ व क्रीडा स्पर्धेत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल जि प शाळा खैरखेड, जि प शाळा पोपटखेड, जि प शाळा शहापुर, व जि प शाळा खिरकुंड. 🏆कन्याकुमारी ते काश्मीर सायकल स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल दिव्यांग धीरज कळसाईत 🎖️शैक्षणिक कार्यात केलेल्या विशेष योगदान बद्दल प्राध्यापक प्रशांत खोडके 🎖️लिंगायत समाजाच्या सामाजिक कार्यात केलेल्या विशेष कार्याबद्दल महादेव आप्पा मुंगसे व सुरभी कोचीग क्लास चे संचालक प्रशांत आप्पा खोडके यांचा मान्यवारांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मा..महल्ले साहेब,ब्रिजमोहन गांधी,सौ,संध्याताई वाघोळे ,यांनी महात्मा बसवेश्वर यांचे कार्य व आजच्या समाजाला त्यांच्या विचारांची गरज आहे असे मार्गदर्शन केले. मा.संजयजी खडसे यांनी समतानायक बसवेश्वर यांचे कार्य व विचार समाजात रूजली तरच सामाजिक समता मजबूत होईल ,अशा सामाजिक कार्याची आज नितांत गरज आहे. असे विचार व्यक्त केले ,बसवविचार समितीच्या कार्याबद्दल प्रशंसा केली . मा.प्रभाकरजी मानकर यांनी रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट अकोट करीत असलेल्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश आप्पा दसोडे यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन सौ किरण वाघमारे (सांगळोदकर ) तर आभार प्रदर्शन उमेश चोरे सर यांनी केले. अकोट तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक व लिंगायत बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
मा.अरुण आप्पा सांगळोदकर, सुरेश आप्पा दरेकर,सागर आप्पा उकंडे,प्रतिक आप्पा गोरे , संतोष आप्पा दरेकर संतोष आप्पा शशांक आप्पा कासवे कैलास आप्पा थोटे ,निशीकांत भुरे, निलेश काळे,विजय पळसोदकर ,राममुर्ती वालसिंगे, शशिकांत भड, देवेंद्र केदार बुधराम बारेवार, सौ.उर्मिलाताई कासवे. सौ सिमा पवार,बबिता सोळंके,सुनिता बारेवार, सौ कल्पनाताई भड सौ सविताताई गोरे तथा समस्त पदाधिकारी बसव विचार समिती व शिक्षक मित्र परिवार अकोट यांनी विषेश प्रयत्न केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button