यांत्रिक जीवनात हरवलेली मनःशांती गीतेच्या ज्ञानातून प्राप्त होऊ शकते श्रीपार्थसारथी प्रभुजी

The peace of mind lost in a mechanical life can be attained through the knowledge of the Gita. Shri Parthasarathi Prabhuji

आबा सूर्यवंशी
( जळगांव जिल्हा प्रतिनिधी)
अध्यात्म आणि भक्तिरस यांच्या संगमातून पाचोऱ्यातील श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी भक्तिभावपूर्ण गहन आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न झाला. भगवद्गीता साप्ताहिक सत्संग अंतर्गत आयोजित या विशेष सत्रात ‘गीतेतील तत्वज्ञान आणि भक्तियोग’ या विषयावर विवेचन झाले.कार्यक्रमाची सुरुवात संध्याकाळी ६ वाजता मंगलाचरण व भगवान श्रीकृष्णाच्या भजनांनी झाली, श्रीमान पार्थसारथी प्रभुजी यांच्या सशक्त आणि चिंतनशील प्रवचनाने वातावरण गहिवरले. त्यांनी गीतेतील अध्यायांचे संदर्भ देत जीवनातील नैतिक मूल्ये, कर्माची शुद्धता, भक्तीचे स्वरूप आणि आत्मोन्नतीचा मार्ग यांचे महत्त्व सांगितले.“आजच्या यांत्रिक जीवनात हरवलेली मनःशांती गीतेच्या ज्ञानातूनच पुन्हा प्राप्त होऊ शकते,” असे सांगत प्रभुजींनी उपस्थितांना निःस्वार्थ सेवा आणि नामस्मरणाच्या दिशेने प्रेरित केले.प्रभुजींच्या शब्दांमध्ये एक गोड संदेश होता, “कर्म किए जा फल की चिंता मत कर ए इंसान ,जैसे कर्म करेगा वेसे फल देंगे भगवान” म्हणजेच, आपल्याला केवळ आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा लागतो, आणि त्याच्या योग्य फळाची चिंता भगवानावर सोडून आपला मार्गक्रमण सुरू ठेवावा लागतो.या वेळी सामूहिक मंत्रजप, कीर्तन आणि गीता पठण यामध्ये शेकडो भाविकांनी सहभागी होऊन अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेतला. “हरे कृष्ण हरे कृष्ण या महामंत्राच्या गजरात मंदिर परिसर भक्तिरंगात न्हालेला पाहायला मिळाला. तसेच येणाऱ्या अक्षय तृतीयेची तयारी कशी करावी व “अक्षय फळ, अक्षय कृपा” कशी मिळवावी – हेही या सत्रात प्रभुजींनी अतिशय साध्या व भावपूर्ण शब्दांत सांगितले.अक्षय तृतीया विषयी मार्गदर्शन करताना, प्रभुजींनी सांगितले की या दिवशी केलेले जप, दान, व्रत व सत्कर्म हे ‘अक्षय’ म्हणजेच कधीही नष्ट न होणारे पुण्य फळ देतात भगवंताच्या नामस्मरणात आणि भक्तीमय सेवेत वेळ घालवणे, गीता पठण, गरीबांमध्ये अन्नदान किंवा प्रसाद वाटप यासारखी सेवा केल्यास अक्षय फळाची प्राप्ती निश्चित होते प्रभुजींनी ही सुवर्णसंधी साधण्याचे आवाहन केले. वरखेडी रोडवरील श्रील प्रभुपाद मार्गावर वसलेले हे इस्कॉन मंदिर पाचोऱ्यातील एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र बनले असून, दर आठवड्याला आयोजित होणारे सत्संग, भजन व कीर्तन करण्यात येते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button