Mumbai news:कथा ही जीवनाची व्यथा दूर करते-वेदशास्त्र संपन्न समाधान महाराज शर्मा
सजल विहीर येथे प्रकट दिन उत्सवाला प्रारंभ,काकडा श्रींचे पारायण हरिनाम कीर्तन आनंद

महाराष्ट्र अकोट
मोहम्मद जुनैद
अकोटःश्री संत गजानन महाराज संस्थान अकोली जहागीर अकोलखेड सजल विहीर शांतीवन अमृततीर्थ येथे रविवार दिनांक 25 पासून श्रींच्या प्रगट दिन महोत्सवाला टाळ मृदंगाच्या गजरात भक्ती उल्हासात प्रारंभ झाला. रविवारी प्रथम दिवशी श्रीमद् भागवत कथेचे पूजन पार पडून कथा प्रारंभ करण्यात आली. वेदशास्त्र संपन्न हभप समाधान महाराज शर्मा नेवासा यांच्या सुमधुर वाणीतून ही कथा पार पडत आहे कथेचे पहिले पुष्प गुंफतांना समाधान महाराज यांनी कथा अमृतवचन सांगितले. यावेळी कथा प्रवचन करताना त्यांनी म्हटले की कथा ही जीवनाची व्यथा दूर करते श्रीमद् भागवत कथा ही भक्ती आनंदाची प्रचिती देणारी आहे कथेमध्ये तेच येतात ज्यांना कन्हैया बोलावतो. चार धामला चार नाथ आहेत मात्र मध्यभागाला पंढरीनाथ आहेत.अन जणु संत श्री गजानन महाराज हे जणु पंढरीनाथच आहेत. ज्यांनी ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश केला उष्ट्या पत्रावळीवरचे अन्न खाल्ले. अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे सांगितलं अशा पवित्र श्रींच्या कृपाशीर्वादाने ही कथा होत आहे म्हणून साधु तोची ओळखावा देव तोची जाणावा.ज्यांच्या जवळ कृष्ण आहे त्यांच्याजवळ प्रश्न नाही. भक्ती ज्ञान वैराग्य तरुण राहिले पाहिजे म्हणून भागवत कथा निर्माण झाली. भक्ती जोवर हृदयात बसत नाही तोवर कथेत रस निर्माण होत नाही असे कथा विवेचन त्यांनी प्रथम पुष्प गुंफतांना केले तत्पूर्वी टाळ मृदंगाच्या गजरात ह भ प समाधान महाराज यांनी श्रींचे व सजल विहिरीचे दर्शन घेऊन वाजत गाजत फटाकांच्या आतीषबाजीत श्रींची पालखी भागवत कथा मंडपात आणली श्री संत गजानन महाराज, श्रीमद् भागवत कथा व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या आरतीने प्रथम पुष्पाची सांगता झाली.
चौकटःनामवंत कीर्तनकारांची कीर्तनं
प्रकट दिन महोत्सव निमित्य सजल विहिरीवर दररोज महाराष्ट्रातील नावाजलेल्या कीर्तनकारांची कीर्तनं होत आहेत प्रथम दिवशी भरगच्च गर्दीत ह भ प नागेश महाराज आगलावे यांचे हरिकीर्तंन पार पडले.
चौकटः श्रींना छप्पन भोगाचं नैवेद्य अर्पित
श्रींच्या प्रकट दिन महोत्सवात प्रथम दिवशी श्रींच्या भक्तांद्वारा संत गजानन महाराज यांना ५६ भोग प्रसादाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला तसेच प्रकट दिन महोत्सवानिमित्त दररोज भाविकांसाठी सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत अविरत भव्य महाप्रसाद वितरित होत आहे.



