फ्रीडम शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश 14 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
आकोट- स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम इंग्लिश स्कूल, आकोट चे 14 विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मंडळाच्या वतीने 18 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 5 वी मधून 10 विद्यार्थ्यानी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा वर्ग 8 वी मधून 4 विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होवून घवघवीत यश प्राप्त केलेले आहे. पात्र विद्यार्थाँमध्ये वर्ग 5 वी मधून ईशिका मनीष गावंडे ,
वेदिका सचिन भगत , गौरी नंदकिशोर गावंडे , अर्णव प्रमोद हिवाळे, विरा प्रशांत खोडके, सर्वदा अविनाश जावरे, सूर्यकांत राजेंद्र भावे , प्रगती श्रीकृष्ण अस्वार, अंजली अनिल दुरतकर , यश दिनेश थोरात तसेच वर्ग 8 वी मधून आफ्रिन अल्बिना सलीम, सोहम विजय रेखाते, श्रावणी विजय भड, कुंदन रमेश हेंद, हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा 2024 मध्ये पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडिल, फ्रीडम संस्थेचे अध्यक्ष मनोज झाडे, शाळा समिती अध्यक्ष प्रविण झाडे , फ्रीडम संस्थेचे सचिव निलेश झाडे मुख्याध्यापिका अरुणा ताले, पर्यवेक्षक विजय रेवस्कर, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षिका ऐश्वर्या बोडखे , पूजा बेराड, वंदना राऊत, मयूरी अकोटकर आदींना दिल्याचे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.



