अतुल संघवी यांनी किती गोरगरीब कर्जदारांना न्याय दिला* निलेश मराठे,माझी उमेदवारी व्यक्तिगत आर्थिक फायद्यासाठी नाही
How many poor borrowers did Atul Sanghvi provide justice? Nilesh Marathe, my candidacy is not for personal financial gain.
पाचोरा प्रतिनिधी आबा सूर्यवंशी
जळगांव आणि अन्य चार जिल्ह्यात विस्तारित आणि जामनेर, शेंदुर्णी , पाचोरा , भडगाव , तालुक्यात सुमारे आठ ते दहा हजार मतदार सदस्य असणाऱ्या बँकिंग क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त पंधरा संचालक मंडळाची पाचोरा पीपल्स बँकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर शक्यतो बँकेची निवडणूक बिनविरोध होणारच अशा चर्चा आणि हालचाली होत्या. नामांकन, छाननी, व माघारीच्या घडामोडीत बँकेचे चेअरमन ॲड.अतुल संघवी सह अन्य आठ संचालकांच्या विरोधातील नामांकन माघारी झाल्याने सुरुवातीच्या ९ जागा बिनविरोध झाल्या. आणि ॲड. अतुल संघवी यांचे वर्चस्व दिसून आले.माघारीच्या अखेर दिनांक ३० जून रोजी अन्य उमेदवार माघार घेतील आणि बँक बिनविरोध होईल अशी शक्यता होती. मात्र जनरल मतदार संघातून निलेश विनायक मराठे यांनी मदतीच्या वेळेत माघार घेतली नसल्याने पाचोरा पीपल्स बँकेच्या बिनविरोध प्रक्रियेच्या प्रयत्नात एकमेव उमेदवाराच्या उमेदवारीने खोडा घातला असून निलेश मराठे हे त्यांच्या व्यक्तिगत आर्थिक स्वार्थापोटी उमेदवारी करून बँकेचे लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान करीत आहे. असा आरोप ॲड. अतुल संघवी यांनी आमदार किशोर आप्पा यांनी पाटील यांच्या उपस्थितीत जयकिरण प्रभाजी बँकेत दि.३० जून च्या सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता.
*माझी उमेदवारी आर्थिक स्वार्था साठी नाही* निलेश मराठे
यांनी पीपल्स बँकेचे चेअरमन ॲड. अतुल संघवी यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपाला उत्तर देण्यासाठी प्रसार माध्यमातून संवाद साधला आहे की, माझी उमेदवारी कोणत्याही कर्जाची, व्याजाची रक्कम कमी किंवा माफ करण्यासाठी नसून मला चेअरमन आणि त्यांचे संचालक मंडळाने आता पर्यंत बँकेचे किती हित जोपासले किती सर्वसामान्य, सदस्य, गोरगरीब कर्जदारांना आणि न्याय दिला हे बघायचे आहे. ॲड .अतुल संघवी यांना बँकेच्या हिताची आणि निवडणुकीतून होणाऱ्या लाखो रुपयांच्या खर्चाची एव्हढी काळजी होती तर त्यांनी बँकेच्या हितासाठी माघार घेऊन मला चेअरमन पद द्यायला पाहिजे होते. माझे कर्ज प्रकरणे न्यायप्रविष्ठ असून आजही बँकेकडे माझे एक कोटी ४० लाख रुपये न्यूली अकाउंट मध्ये जमा आहे. माझ्या कर्ज प्रकरणा संदर्भात न्यायालयात सुरू असलेल्या लढाईसाठी मी समर्थ आहे. मी माझे कर्ज, किंवा व्याज माफ करा अशी कोणतीही मागणी बँकेकडे केलेली नाही, आणि करणार नाही . चेअरमन अतुल संघवी बँक आणि जनतेचे हित कसे करतात हे बघायचे आहे म्हणून मी निवडणूक लढण्यावर ठाम आहे .बँकेच्या मतदारांनी माझ्या छत्री निशाणीवर शिक्का मारून विजयी करण्याचे आवाहन पाचोरा पीपल्स बँक निवडणूक लढणारे एकमेव उमेदवार निलेश विनायक मराठे यांनी प्रसार माध्यमातून केले आहे. या वेळी त्यांचे ज्येष्ठ काका सुरेश मराठे,वडील विनायक मराठे, कायदेशीर सल्लागार ॲड.शांतीलाल (बापू) सौंदाणे उपस्थित होते.