पाचोरा पिपल्स बॅक निवडणुकीत एक उमेदवार नडला ; बिनविरोधचा प्रयत्न फसला

एकमेव उमेदवाराच्या आडमुठे धोरणातून बँकेचे आर्थिक नुकसान !

पाचोरा प्रतिनिधी -(आबा सूर्यवंशी)

बँकिंग क्षेत्रात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पाचोरा पिपल्स बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. बँकेचे १५ संचालक मंडळ असते. या बँकेचा पाच जिल्ह्यात विस्तार वाढला असून पाचोरा, भडगांव आणि जामनेर तालुक्यात बँकेचे मतदार सभासद असल्याने या बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विद्यमान चेअरमन यांनी मंत्री गिरीश महाजन, आमदार किशोर पाटील, माजी आ.दिलीप वाघ यांचे कडे सहकार्य अपेक्षित ठेवले होते. सहकारात राजकारण नको म्हणुन या तिघांनी बँकेच्या निवडणुकीत पॅनल न टाकता विद्यमान संचालक मंडळाला हिरवा कंदील दिला होता. त्यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या घडामोडीत जनरल मधून जागांसाठी विद्यमान चेअरमन ॲड. अतुल सुभाषचंद्र संघवी सह प्रशांत श्रीकिसन अग्रवाल, स्वप्निल सुधारकर पाटील, देवेंद्र रमनलाल कोटेचा, अनंतराव बाबुराव पाटील, राहुल अशोक संघवी, नरेंद्र उत्तमराव पाटील, पुखराज इंदरचंद डांगी , अविनाश वसंतराव कुडे. अन्य उमेदवारांनी माघार झाल्याने जनरल च्या ९ उमेदवार बिनविरोध झाल्या असताना ॲड.अतुल संघवी यांचे सहकार पॅनेलचे बँकेवर वर्चस्व स्पष्ट झाले. मात्र सहकार पॅनलविरुद्ध माघारीच्या अखेर पर्यंत निलेश विनायक मराठे यांनी जनरल मधून एकमेव अर्ज माघारी न घेतल्याने बँकेचा बिनविरोधाचा आटापिटा अडचणीत आला म्हणून आता एक जागेसाठी निवडणूक होणार असून उर्वरित ९ जागांसाठी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. विशेष म्हणजे ओबीसी, महिला, शाखा, एनटी व अनुसूचित जाती-जमाती राखीव जागांवर बिनविरोध निवड झालेली आहे. ओबीसी जागेवर भागवत एकनाथ महालपुरे , पवन राजमल अग्रवाल, महिला जागांवर सौ. संगिता शरद पाटे व सौ. संध्या प्रकाश पाटील, एनटी प्रवर्गातून विकास ज्ञानेश्वर वाघ, अनु. जाती-जमाती प्रवर्गातून अविनाश मुकुंदराव भालेराव यांची बिनविरोध निवड झाले आहे.
*एकमेव उमेदवाराच्या आडमुठे धोरणातून बँकेचे आर्थिक नुकसान* ॲड.संघवी,
एकमेव निलेश मराठे यांच्या एकमेव उमेदवारी मुळे वेळ , पैसा आणि मेहनत टाकून बँकेचे हित जोपासण्यासाठी निवडणुकीसाठी बँकेचे लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी माघारीच्या अखेर पर्यंत उमेदवारी करणाऱ्या निलेश मराठे यांना सर्व स्तरावर प्रयत्न करण्यात आले, आमदार किशोर आप्पा पाटील यांनी देखील उमेदवाराची नाराजीची बाजू ऐकून घेत त्यांना बँकेच्या हितासाठी माघार घेण्या साठी प्रयत्न केला मात्र उमेदवाराने कोणाचेच ऐकून न घेता उमेदवारी कायम ठेवल्याने बँकेच्या बिनविरोधचा प्रयत्न फसला असून येत्या १३जुलै रोजी मतदान होणार आहे.
दि.३० जून ची माघार प्रक्रिया पार पडल्या नंतर अतुल संघवी यांनी ज्यकिरण प्रभाजी बँकेत आ. किशोरआप्पा पाटील यांच्या उपस्थितीत तातडीची पत्रकार परिषद घेऊन बँकेची निवडणूक टाळण्यासाठी माघार घेणाऱ्या सर्वांचे आभार मानले. विरोधी उमेदवार निलेश मराठे हे त्यांच्या वैयक्तिक आर्थिक हितासाठी बँकेला वेठीस धरून आडमुठे धोरणातून उमेदवारी करीत असल्याने बँकेचे सुमारे वीस , पंचवीस लाखांचे आर्थिक नुकसान आणि वेळ वाया जाणार आहे. आ. किशोर आप्पा पाटील म्हणाले की सहकारात राजकारण नको म्हणून मी ,माजी आमदार आणि मंत्री श्री. महाजन यांनी मोठेपणा दाखवून बँकेच्या हित पाहून सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र एकमेव उमेदवार निलेश मराठे यांची सर्वांनी आणि मी देखील बँकेच्या हितासाठी समजूत काढून देखील ते उमेदवारी वर कायम आहे.
*मतदारांनी पीपल्स बँकेत सहकार पॅनल विजयी करावे* आमदार किशोर पाटील
पीपल्स बँकेच्या मतदारानी ॲड.अतुल संघवी यांच्या सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन प्रसार माध्यमाच्या वतीने केले आहे. या वेळी बँकेचे बिनविरोध झालेले संचालक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button