Akola:सासू घ्यायची सतत जावयाच्या चारित्र्यावर संशय; मग जावयानं रागाच्या भरात थेट सासूला कायमचं संपवलं! नेमकं काय सपूर्ण घटना?

अकोट महाराष्ट्र
मोहम्मद जुनैद
अकोला : विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. अकोट ग्रामीण पोलिसांनी एक हत्याकांड उघडकीस आणले आहे. या हत्याकांडात अपघात असल्याच बनाव रचण्यात आला होता. दरम्यान एका 60 वर्षीय महिला आपल्या जावयावर संशय घेत होती, त्यातून अनेकदा दोघांचे वाद व्हायचे. याच रागाच्या भरातून जावयानं थेट सासूला कायमच संपवलंय. परंतु सासुचा मृत्यु अपघाती असावा, अस दर्शवन्यासाठी त्याने सासूचा मृतदेह रामापूर शेतशिवारातील विहिरीत फेकून दिलाय, आणि घटनास्थळावरून पळ काढला. मात्र वैद्यकीय अहवालात सर्व बिंग फुटलं आणि जावयानं केलेलं कृत्य पोलिसांनी 4 दिवसांतच उघड केलंय. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं 3 मे रोजी काय घडलंय?
तारीख 3 मे 2024… अकोट तालुक्यातील ग्राम धारुळ पुनर्वसित गाव. येथील कमलाबाई गंगाराम बेठेकर (वय 60) या इंधन आणण्यासाठी सकाळीच शेतशिवाराकड़ं निघाल्या. दुपारची वेळ उलटूनही कमलाबाई घरी न परतल्याने त्यांचा मुलगा आईच्या शोधार्थ बाहेर पडला. रामापुर शेतशिवारात मुलगा पोचला असता एका विहिरीत त्याने डोकावून पाहलं असता.. विहीरित आईचा मृतदेह पडून दिसून आला. याची माहिती लागलीच अकोट ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. कदाचित तोल गेल्याने कमालाबाईचा विहिरीत पडून मृत्यु झाला असावा, अशी शक्यता घटनास्थळी वर्तवण्यात येत होती. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला. दोन दिवसानंतर वैद्यकीय अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आणि त्यामधून काही धक्कादायक खुलासे उघड झाले.
नेमकं काय होतंय वैद्यकीय अहवालात?
कमलाबाई गंगाराम बेठेकर यांच्या वैद्यकीय अहवालात काही बाबी उघडकीस आल्या. त्यांच्या गळ्यावर धारधार अवजारानं जखम केल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळ त्यांचा मृत्यु झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्राप्त अहवालाच्या आजारावर अकोट पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बोडखे यांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान बोडखे यांना मयताचे जावयावर संशय झाला आणि त्याला ताब्यात घेत विचारपुस केली.
या कारणाने त्यानं सासूला कायमचं संपवलं-
अर्जुन शंकर कासदेकर असं मारेकरी जावयाचं नाव असून तो धारुड इथेच राहत असायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन याची पत्नी त्याला सोडून गेली आहे, तेव्हापासून तो त्याच्याच सासरवाडीत राहायचा. राहण्यापासून तर जेवणापर्यंत सर्व सासूकडेच असायचं. दरम्यान काही दिवसांपूर्वी सासूला त्याच्यावर संशय झाला की जवाई हा आपल्या मुलाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतो आहे. त्यातून त्यांचे अनेकदा वाद झाले, त्यानंतर जावयाचा घरात घ्यायला कमलाबाईंचा स्पष्ट विरोध राहला. याचाच राग त्याच्या मनात घर करून बसला. त्यानं सासूला कायमचं संपवण्याच निश्चित केलंय.
दरम्यान 3 मे रोजी दुपारच्या सुमारास रामापुर शेत-शिवारात सासू त्याला एकटी दिसली, त्याने जवळील धारदार अवजारानं सासूच्या गळ्यावर वार केला, आणि त्यानंतर सासुचा मृतदेह विहिरीतच फेकून दिलाय.
दरम्यान सद्यस्थितीत अर्जुन कासदेकर हा पोलिसांच्या अटकेत असून त्याच्याविरुद्ध अकोट ग्रामीण पोलिससांत खूनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



